Sindhudurg 416534
+91-9404 357199
info@sindhudurg-paryatan.com

Devotional

येवा कोंकण आपलीच आसा !!!

श्री देव वेतोबा

वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविक जनतेचे श्रध्दास्थान आहे. संकटसमयी भक्ताच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पाहणारा देव अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे. वेंगुर्ले-शिरोडा-रेडी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. रस्त्यावरुनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभार्‍यात श्रीदेव भूमय्या, देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, देव बाराचा ब्राह्मण, देव भावकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे या द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे दोन हजार लोक सहज बसू शकतील. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलतात. श्री वेतोबाच्या वर्षातून दोनदा कार्तिक शुध्द १५ व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. श्री वेतोबास सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद लावण्याची वहिवाट आहे. योगी राज बापूमामा केणी महाराजांचे आरवलीच्या या श्रीदेव वेतोबास श्रीदेव विठ्ठल मानून भजत असत. आरवलीच्या वेतोबा देवस्थानात योगीराज बापूमामा केणी यांचा पाडवा नावाचा समारंभ ज्येष्ठ शुध्द प्रतिपादेस करतात. जेव्हा वेतोबा देवस्थानात काही अडचण किंवा संकट निर्माण होते तेव्हा बापू मामांना हाक मारुन त्यांचा अंधार उभा राहिल्यावर त्यांचा सल्ला घेतला जातो. श्रीदेव वेतोबाचे देवालय इ.स. १६६० मध्ये बांधण्यात आले. या देवालयाचा सभामंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. श्रीदेव वेतोबाचे देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे.

श्री देवी भराडी

मालवण शहरापासून १५ की. मी. वर आडारी पूल, महान गाव मागे टाकल्या नंतर मालवण – बेळणा – कणकवली या राज्य मार्गावर वसलेली वाडी म्हणजेच श्री देवी भराडी च्या अधिवासाने पावन झालेली आंगणेवाडी होय. या ठिकाणी जवळपास आठ लाख भाविक यात्रोत्सवासाठी येतात. त्यामुळे या एक दिवसासाठी या यात्रेचे नियोजन कसे चालते, येथील लोकांचे वेगळेपण,चाली रीती आदि गोष्टींबाबत माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल.आंगणेवाडीत प्रवेश करण्यासाठी या मुख्य रस्त्या सोबतच मसुरे येथून दत्त मंदिर मार्गे व कांदळ्गाव तसेच बागायत मार्गे रस्ते आंगणेवाडीत येतात.येथील ९५ ट्क्के ग्रामस्थ ‘ आंगणे ’ या आडनावाचे असल्यानेच त्यांची वस्ती असलेली वाडी म्हणजेच आंगणेवाडी होय. मसुरे गावातील या वाडीस त्या मुळेच आंगणेवाडी हे नाव पडले.

जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला गाव म्हणजे मसुरे होय.या गावातील एकूण १५ महसूली गावांपैकी आंगणेवाडी हा एक महसूली गाव होय. मसुरे ग्रामपंचायतीच्या पाच वॉर्ड पैकी आंगणेवाडीचा समावेश वॉर्ड क्रमांक एक म्ध्ये होतो. येथील एकूण लोक्संख्या ३५० असून १७२ पुरूष १७८ महिला आहेत.एकूण मतदारांची  संख्या २४३ असून पुरूष मतदार १०५ तर महिला मतदार १३८ आहेत. येथील घरांची संख्या १६० आहे. आंगणेवाडीचे एकूण क्षेत्रफळ ५३८ हेक्टर आहे. शेती खालील क्षेत्र १६१ हेक्टर, जंगल १८ हेक्टर, तर पडिक जमिन साधारण १९२ हेक्टर आहे. गावातील एकूण कुटुंबांची संख्या १२३ आहे. आंगणेवाडीला लागणारी पाण्याची गरज ५८ खाजगी विहीरी, दोन सार्वजनिक विहीरी, चार विधन विहीरी मार्फत भागविली जाते. महसूल विभागाचे एक तलाठी कार्यालय येथे आहे.शैक्षणिक सोई संदर्भात आंगणेवाडी येथे एक अंगणवाडी,पहिली ते चौथी साठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना बिळवस माध्यमिक विद्यालय येथे जावे लागते. संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हागंदारीमुक्त गावाची संकल्पना जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहे. गावात सतरा ठिकाणी  स्ट्रिट लाईट तसेच सौर पथदिपांची सोय आहे.

झुंझार पेडणेकर