Sindhudurg 416534
+91-9404 357199
info@sindhudurg-paryatan.com

सदाशिव पांचाळ

येवा कोंकण आपलीच आसा !!!

माईंड ट्रेनर आणि मोटिव्हेशनल स्पिकर

२००३ पासून प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

राष्ट्रीय स्तरावरिल ख्यातनाम माइंड ट्रेनर श्री विठ्ठल कोतेकर यांचेकडून माईंड ट्रेनिंग व सायंटिफीक क्रियेटीव्ह व्हीज्यूअलायझेशन प्रशिक्षण घेतले आहे.

“मॅनपावर”या संस्थेचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय ट्रेनर मुरली कृष्णा (बेंगलोर) यांच्या कडून स्मरणशक्ति व व्यक्तिम तेत्व विकास विषयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

प्रा. जी. एस. खानापूरे (कोल्हापूर) यांच्याकडून हिप्नोटिझमचे (संमोहन शास्त्र) शिक्षण घेतले.

कै. मुरली खैरनार यांच्याकडून श्री. पांचाळ यांनी तल्लख मेंदू व कार्यक्षमता, निमॉनिक्स (स्मरणशक्ती) शास्त्राचे प्रशिक्षण घेतले.

“बॉर्न टू वीन” चे अतुल राजोली (मुंबई) यांच्याकडून श्री. पांचाळ यानी व्यवसाय व्यवस्थापन विषयक, व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन घेतले आहे.

मानसशास्त्राचे अभ्यासक श्री. पांचाळ यानी शाळा आणि शाळाबाह्य मिळून गोवा, सिन्धुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर मिळून येथे १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत ७८६ पेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत.

या कार्यक्रमांतून स्मरणशक्ती, गणित, कोणताही पाढा एका मिनिटात, माईंड ट्रेनिंग, मेंदू आणि कार्यक्षमता, पब्लिक स्पिकींग, स्टेज डेअरींग, आंतरिक शक्ती, स्वतःला कायम कसे कार्यक्षम कसे ठेवावे, वाचन शास्त्र, श्रवणशास्र, परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी, सब कॉन्शियस माईंडची जादू असे व्यक्तीमत्व विकासाबाबतचे अनेक विषय यशस्वीरित्या हाताळून हजारो तरूणांना यशाचा मार्ग दाखवला आहे .

विशेष:
झी मराठी वाहीनीच्या “चला हवा येऊ द्या” कार्यक्रमाचे सेटवर सदाशिव पांचाळ यांनी आपली कन्या कु. मृण्मयी पांचाळ मदतीने मराठी सुपरस्टार भरत जाधव, डॉ. निलेश साबळे व टिम समक्ष स्मरणशक्ती प्रात्यक्षिके सादर केली आहेत.

पुणे (मुळशी) मेरे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिनानिमित्त एकाच वेळी १००० मुलाना मार्गदर्शन करण्याचा मान मिळाला.

गोवा येथील अग्रगण्य दैनिक गोमंतक च्या वतीने सदाशिव पांचाळ यांचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगे (गोवा) येथील आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या मतदारसंघातील १२ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ४ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी (सिनियर) महाविद्यालयासाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन.

त्यांच्या कार्यक्रमात अनेक शिक्षक, शिक्षण खात्याचे अधिकारी, सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, प्राचार्य विद्यार्थी, पालक तसेच स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थी यानी लाभ घेतलेला आहे.

श्री. सदाशिव पांचाळ याना मिळालेले पुरस्कार:

समाजभुषण पुरस्कार (शिक्षक विकास परिषद, गोवा)

लक्षवेध पुरस्कार (बोर्न टू विन, मुंबई)

ज्ञानदीप पुरस्कार (ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडी, सिन्धूदुर्ग)

राज्यस्तरिय शैक्षणिक युवा प्रेरणा पुरस्कार (कला, क्रीडा, साहित्य, संस्क्रुती संमेलन कोल्हापुर)

विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा १०० हून अधिक संस्थानी सदाशिव पांचाळ यांचा त्यांच्या कार्याची दखल घेऊन सत्कार – सन्मान केले आहेत.

अधिक माहितीसाठी
सदाशिव पांचाळ
मोटिव्हेशनल स्पिकर
९९२३५९०९४२